श्री स्वामी समर्थ यांचा चमत्कार .

।। श्री स्वामी समर्थ ।।

भारत भूमीवर ईश्वराने मानवी रूपात अनेक अवतार घेतले आहेत. त्यापैकी दशावतार हे प्रमुख असून बाकी अनेक उप अवतार आहेत. श्री दत्त श्रीपाद वल्लभ नर्सिंग सरस्वती आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे सर्व मुख्य उप अवतार समजले जातात. याशिवाय अनेक विभूतीने जे अवतारुप संत रूपात धारण केले ते अंश अवतार म्हणून ओळखले जातात. श्री स्वामींचा अवतार हा एकोणिसाव्या शतकातील प्रमुख अवतार आहे. श्री स्वामी समर्थांचे अलौकिक चरित्र हे फारच विलोभनीय आकर्षक आणि तर्का च्या पलीकडचे असे आहे. 

स्वामीसमर्थ
स्वामीसमर्थ
 
एकदा एक माणूस मरता नाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारले या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. संतांनी सांगितलं जर स्वर्गा तली माती आणली तरच, तो या यातनेतून मुक्त होईल सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणणार...?

संतांचे ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत गेला, आणि एक मूठ भरून माती घेऊन परत आला. आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातील माती घेतली, आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावताच तो माणूस यातना मुक्त झाला, आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पहिल, आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं. बाळा तू ही माती कुठून आणली. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काय? काही क्षणात तू माती घेवून आला.


त्यावर लहान मुलांनी उत्तर दिले की, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं. आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलां मध्ये जे स्वर्ग आहे, ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई  उभी असलेल्या जागेवरून घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले खर आहे.

 ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात.
त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा पैसा मिळवा आकाशाला गवसनी घाला. पण आई आनंदी नसेल, तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलेही दानधर्म केल्यानंतरच मिळणार फळ तुम्हाला मिळणार नाही.

श्री अक्कलकोट स्वामी महाराज.....


Post a Comment

0 Comments