महाराष्ट्र शासन जीआर

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीकरिता निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी बाबत…

GR
Government of India 

महाराष्ट्र शासनाने नवीन GR घोषीत  केला आहे.

महाराष्ट्र शासन 

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक टीआरएन 0217/प्र. क्र.02/सीपीटीपी

मंत्रालय मुंबई 400 032

दिनांक 28 नोव्हेंबर 2023

संदर्भ:-

1. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. टीआरएन 2013/प्र क्र 84/13/12अ, दिनांक 21. 1. 2014.

2. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. टीआरएन 0216/प्र. क्र. 58/सीपीटीपी दिनांक 4. 1. 2017.

3. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. टीआरएन 0117/प्र. क्र.02/सीपीटीपी दिनांक 2. 2. 2017.

4. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. टीआरएन 0217/प्र. क्र.02/सीपीटीपी दिनांक 27. 6. 2023

प्रस्तावना:-

  • राज्यसेवा परीक्षा द्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून प्राप्त वैद्यकीय अहवाल व उमेदवारांनी दिलेल्या पदांचा प्राधान्यक्रम यानुसार अंतिम शिफारस करणे शक्य व्हावे याकरिता उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भातील विहित कार्यपद्धती मध्ये संदर्भ क्र. 4. येथील दिनांक 27 6 2023 च्या शासन निर्णया नुसार बदल करण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पासून मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
  • मुलाखतीस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी विभागीय वैद्यकीय मंडळे स्थापन करणे उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्याकरता स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास काही कालावधी आवश्यक असल्याने राज्यसेवा परीक्षा द्वारे मुलाखती करता निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर करण्याची कार्यपद्धत ही राज्यसेवा परीक्षा 2022 ऐवजी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

शासन निर्णय क्र. टीआरएन 0217/प्र. क्र.02/सीपीटीपी

शासन निर्णय:-

  • एकत्रित परिविक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीकरता निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी बाबतचा संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक 27 6 2023 रोजी चा शासन निर्णय राज्यसेवा परीक्षा 2022 ऐवजी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून लागू होईल
  • सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 20 23 11 28 10 50 32 41 07 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने........

Post a Comment

0 Comments