Tata tech IPO and shares are ready for alot

 टाटा टेकचे चे शेअर्स आज होणार अलॉट; तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही ‘असे’ तपासा, प्रक्रिया समजून घ्या.

Tata Tech IPO Allotment Status:-

टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करणारे लोक आता शेअर्सच्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज IPO ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, टाटा टेकच्या शेअर्सचे वाटप मंगळवारी होण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांना लॉटरी पद्धतीने शेअर्सचे वाटप करण्यात येईल आणि संपूर्ण प्रक्रिया रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली पार पाडली जाईल.

Highlights:-

टाटा समूहाने १९ वर्षांनंतर शेअर बाजारात आयपीओ घेऊन आला

आयपीओद्वारे ३,०४२ कोटी रुपये उभारण्याचे टाटा टेक्नॉलॉजीजचे उद्दिष्ट आहेnull

हा आयपीओ तीन दिवसांत ६९.४ पट सबस्क्राइब झाला.

मुंबई :- टाटा समूहाच्या बहुप्रतीक्षित टाटा टेक्नॉलॉजीज मंगळवारी IPO अंतर्गत ऑफर केलेले शेअर्स वाटप करण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना लॉटरी पद्धतीने शेअर्स देण्यात आली आणि संपूर्ण प्रक्रिया रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली पार पडली. तब्बल दोन दशकानंतर शेअर बाजारात आलेल्या टाटा समूहाच्या पहिल्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून उस्फुर्द प्रतिसाद मिळाला. टाटा टेकचा ३,०४२.५ कोटी रुपयांचा आयपीओ शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) शेवटच्या दिवशी ६९.४३ पट सबस्क्राइब झाला असून कंपनीने आयपीओसाठी ऑफरची किंमत निश्चित केली. टाटा मोटर्सच्या या उपकंपनीने प्रति इक्विटी शेअर ५०० रुपये निश्चित केले आहेत.

टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्सचे वाटप

Tata technology shares are ready to buy

टाटा ग्रुपच्या आयपीओमध्ये बोली लावलेले गुंतवणूकदार आता शेअर वाटपाच्या प्रतीक्षेत असून येथे आम्ही तुम्हाला शेअर्सच्या वाटपाची स्थितीत तपासण्याबद्दल स्टेप-बाय-स्टेप माहिती देत आहोत. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओने सर्व रेकॉर्ड मोडले

Tata technology IPO
बाजारात सब्स्क्रिप्शनसाठी येताच टाटा टेकच्या आयपीओने एकाच वेळ अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. टाटा समूहाच्या या आयपीओला देशात आतापर्यंत सर्वाधिक अर्ज मिळाले असून आयपीओसाठी ४७५ ते ५०० रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आला होता तर, ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा स्टॉक ४२० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे म्हणजेच बाजारात टाटा टेक्नॉलॉजीचा एक शेअर ९२० रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो. 30 नोव्हेंबर म्हणजेच आज शेअर बाजारात लिस्ट होण्या अपेक्षित आहे. 


Post a Comment

0 Comments