Easy dinner recipe



दम आलू
Aalu
Dam aalu 



साहित्य -

४-५ लहान बटाटे, ३ मध्यम आकार ची टोमॅटो, २ मध्यम साइज़ चे कांदे, २ चमचे दही , अदरक-लहसून ची पेस्ट, ४ -५ काजू , कोथिंबीर, लाल तिखट मसाला , गरम मसाला, जिरे, मीठ, पाणी.

कृती-

कुकर मधे बटाटे हलके शिजवण्यासाठी १ शिट्टी करुन घ्यायची. त्याची साल काढून काटा चमचे ने त्याला आत मधे मसाल्याची चव जाण्यासाठी थोडे थोडे लहानसे होल पाडून घ्यायचे.


 गॅस चालू करुन गॅस वर कढई ठेवा, कढई मधे १ चमचा तेल घाला. बटाटे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.


त्याच कढई मधे २ चमचे तेल घाला. त्या मधे तेल गरम झाले की जिरे , अदरक-लहसून ची पेस्ट घाला,


 २ बारीक चिरलेले कांदा घाला , कांद्याला बारीक गॅस करुन गोल्डन रंग येऊपर्यंत भाजा, त्यात २ टोमेटो बारीक चिरलेले घाला.



१ टोमेटो आणि काजू त्यांची पेस्ट करुन घाला. नंतर चविनुसार मीठ आणि दही घाला.


त्याला तेल सुटेपर्यंत बारीक गॅस वर झाकून ठेवा. तेल सुटले की, त्यामद्धे लालतिखट , गरम मसाला घाला.



तुमच्या गरजेनुसार पाणी घालून, ५ मिनिट उखळी येऊ द्या. मग त्यात बटाटे घाला परत ४-५ मिनिटे झाकण लावून ठेवा. सजवण्यासाठी कोथिंबीर वापरा. दम आलू तयार आहे. सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे.

तुम्ही रेसिपी करुन बघा आणि मला कमेंट बॉक्स मधे नक्की कळवा.



Post a Comment

0 Comments