आई वडिलांना सांभाळा तरच वारस नोंद होणार अन्यथा……..

आई वडील यांच्या नंतर आता मुलांना त्यांचे वारस होता येणार नाही


meeting


आई वडिलांना सांभाळा तरच ग्रामपंचायत मध्ये वारसाची नोंद होईल अन्यथा होणार नाही, असा निर्णय वडची येथील ग्रामपंचायत ने महत्वपूर्ण ठराव घेतलेला आहे. या ठरावाच्या प्रति वरिष्ठांना पाठवण्यात आल्यात. ग्रामपंचायत च्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.

एवढंच नव्हे तर आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या वारसा साठी भविष्यात ग्रामपंचायत कडून कुठलीच दखल घेतली जानार नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा दाखला आणि सही देण्यात येणार नाही जो मुलगा किंवा एकत्रित राहणारी मुले आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाही, त्या मुलांना आई-वडिलांचे नावावरील वरील संपत्तीचे वारसदार होता येणार नाही. असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

सरपंच

meeting


नुकत्याच पार पडलेल्या आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आम्ही एक ऐतिहासिक ठराव घेतला. जो आई-वडिलांना सांभाळणार नाही त्याची आम्ही वारस म्हणून नोंद घेणार नाही. यासाठी माझ्या गावकऱ्यांनी, उपसरपंच, पोलीस पाटील, तसेच आमचे ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी सर्वांनी संमती दर्शवली, व हा ठराव प्रस्थापित केला खरंतर सामाजिक संवेदना संपत चाललेल्या असताना, हा निर्णय घेणे खूप गरजेचे होते. पण याच वेळेत जर मुलांनी पाठ फिरवली तर त्यांनी करायचं काय याच गोष्टीला तडा जावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.


meeting


आईवडिल कडे दूर्लक्ष करणाऱ्या मुलांच्या कृतीला यामुळेच अळा बसणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वृद्धांना सन्मानाची वागणूक मिळणार आहे. तसेच जी मुले आई-वडिलांचा सांभाळ करतात त्यांनाच वडिलांच्या मालमत्तेत वारसदार म्हणून हक्क मिळणार, तशी वारसा नोंद केली जाणाऱ्या असे स्पष्ट करण्यात आले वडिलांना जगणं मात्र कठीण झालेलं आहे त्यामुळेच ग्रामपंचायतीने केलेला हा ठराव कौतुकाचा विषय ठरतोय शिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी असा ठराव करावा असं आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments