अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका, द्राक्ष, डाळिंब, कांदा उद्धवस्त


अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस

unseasonal rain in maharashtra

अवकाळी पाऊसची राज्यात सुरुवात.

राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब बागा उद्धवस्थ झाल्या आहेत. 

कांदा पिकाचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांपासून गारपीटसह अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे.

 नाशिकच्या द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले. डाळिंब बाग आणि कांदा पीकाचे नुकसान झाले आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ आणि आता अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. 

अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरापाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागात गारपीटमुळे काश्मीरसारखे चित्र दिसत होते.

तुफान गारपीटमुळे शेतात गारांचा खच पडलेला दिसत होता. गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याच्या नुकसानीमुळे पुढील काही महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होणार आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा, गहू पिकासह रब्बीच्या इतर पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली आहे. विजेचे खांब कोसळले आहे. अनेक घरांची छाप्पर उडून गेली आहे. शेतात पाणीच पाणी झाले आहे.

Post a Comment

0 Comments